नाशिक : दिंडोरीतील न्याहारी डोंगरास आग

डोंगराला आग,www.pudhari.news

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याच्या वनपरिसरातील आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून, रोजच वेगवेगळ्या ठिकाणी आगीमुळे डोंगर-दऱ्यांतील हिरवळ नष्ट होताना दिसत आहे. बुधवारी (दि.१५) सायंकाळी ७.३० च्या सुमारास दिंडोरी शहराजवळील दक्षिण-पूर्व बाजूच्या वनपरिक्षेत्रातील न्याहारी माता डोंगर परिसरात अज्ञाताकडून आग लावण्यात आली. या आगीत जळणारी वनराई वाचविण्यासाठी स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले.

गेल्या काही वर्षांपासून या डोंगर परिसरात वृक्षारोपणासह संगोपनाचे काम करणाऱ्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते अशा घटनांमुळे मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बुधवारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी गुलतुराचा पाला व इतर झुडपांच्या फांद्यांचा वापर केला. मात्र, आग नियंत्रणात येत नसल्याने शेवटी त्यांनी अंगातील गरम कपडे, स्वेटर, मफलरी, जाड टी शर्टचा वापर करत आग नियंत्रणात आणली. त्यानंतर होरपळलेल्या झाडांना कोराटे येथील उपसरपंच बाळासाहेब कदम यांनी पाणी भरून आणलेल्या ड्रमच्या साह्याने पाणी देऊन झाडाजवळील जमिनीचे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.

यासाठी सजन फलाणे, रोशन संधान, सागर बाळासाहेब कदम, विकास कदम, शांतिगिरी वाजुळ, मच्छिंद्र गायकवाड, शुभम मोजाड, रवींद्र बदादे, मानव बदादे, अजय बदादे, अंकुश बदादे, सोमनाथ बदादे, सोमनाथ वागले, समीर बदादे, प्रदीप गवे, गंगा गवे, सोमनाथ कोकाटे, संस्थेच्या सदस्यांसह परिसरातील निसर्गप्रेमी नागरिकांनी योगदान दिले.

हेही वाचा : 

The post नाशिक : दिंडोरीतील न्याहारी डोंगरास आग appeared first on पुढारी.