Site icon

नाशिक : दिंडोरीत १९४ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी- वणी रोडवर आवनखेडजवळ १९४ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यावेळी वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला.

याबाबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम चालू केली आहे. दिंडोरी – वणी रोडवर बेशिस्त वाहने अडवून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी मोटरसायकलवरील ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, मोठ्या वाहन चालकांचे सीटबेल्ट तपासण्यात आले. तर काही वाहनांची कागदपत्रे तपासण्यात आले. यावेळी अनेक वाहनांवर व चालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेचे सुनील शिंदे, सुनील पैठणकर, रमेश शिंदे, सोज्वळ, काकड, गुरुकुल, आदीसह पोलीस पथक उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

The post नाशिक : दिंडोरीत १९४ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.

Exit mobile version