नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (दि.१८) मतदान झाले. तालुक्यात सरासरी 86.26 टक्के मतदान झाले. शेवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 90 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी 83 टक्के मतदान जालखेड येथे झाले.

सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. दुपारच्या टप्प्यात संथ गतीने मतदान सुरू होते. दुपारी तीननंतर मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. प्रशासनाने सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. आता तालुक्याचे लक्ष मंगळवारी (दि.२०) होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे

खालील गावात झालेले मतदान

उमराळे बु.=82.8%
रामशेज 90 %
निळवंडी 86.5 %
जालखेड 83 %
वनारवाडी 88.2 %
कोकणगाव खु. 86.7 %
दिंडोरी तालुका एकूण टक्केवारी 86.26 %

हेही वाचलंत का ? 

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.