नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पावसामुळे तालुक्यातील धरणाच्या साठ्यामध्ये वाढ होत असून, पालखेड धरण ४८ टक्के भरले आहे. धरणातून कादवा नदीत पात्रात ६९२० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कादवा पात्रालगत असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्यामुळे  धरण आणि कंसात टक्‍केवारीत पाणीसाठी :    करंजवण( 23) वाघाड ( ३०),  पुणेगाव (१९), ओझरखेंड ( २८)  तीसगाव धरण साठ्यात अजून कुठलीही वाढ झालेली नाही.

आज दिंडोरी तालुक्यात पडलेला पाऊस –

दिंडोरी 68.00 mm
रामशेज. 64.00 mm
ननाशी. 209.00 mm
उमराळे 62.00 mm
लखमापूर 55.00 mm
कोशिंबे 148.00 mm
मोहाडी 53.00 mm
वरखेडा 46.00 mm
क वणी 50.00 mm

पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वार परिचलन पातळी पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वाढल्यामुळे सकाळी 11:00 वाजता पालखेड धरणातून विसर्ग वाढवून 6920 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल.
– सुदर्शन सानप, शाखा अभियंता, पालखेड धरण

हेही वाचलंत का ? 

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग appeared first on पुढारी.