नाशिक : दिंडोरी पोलीसांची कारवाई तीन लाखाची दारु व वाहन जप्त –

नाशिक

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक फायद्यासाठी अवैध दारुची वाहतुक करणाऱ्या संशयिताला सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी अटक केले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिंडोरी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक – पेठा रस्त्यावरुन गोळशी येथे कारमधुन अवैधरित्या बनावट देशी दारुची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलीस पथकाने सापळा लावला.

दरम्यान, चाचडगाव येथे भरधाव वेगात MH 15-CD-5220 हे वाहन आले. या वाहनाला थांबण्याचा इशारा देऊनही सदर वाहन थांबले नाही. चाचडगाव येथील टोलनाक्यावरील बॕरिक्रेट तोडुन पळून जाताना पोलीसांनी पाठलाग करत वाहनचालकाला पकडले. यावेळी त्याच्याकडे 50,400 रुपयांची अवैध दारु व 2लाख 50 हजाराचे वाहन असा सुमारे 3 लाख 400 रुपयांचा ऐवज जप्त केला. वाहनचालक सागर उर्फ भैय्या राजू पवार (ता. निफाड) याला अटक केली. या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

हेही वाचा;

The post नाशिक : दिंडोरी पोलीसांची कारवाई तीन लाखाची दारु व वाहन जप्त - appeared first on पुढारी.