नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

 नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह जिल्हयातील सर्वच बाजार समित्या आज शनिवार दि. २२ पासून ३० ऑक्टोंबर पर्यंत दिवाळी निमित्त दहा दिवस बंद राहणार आहेत.

दिवाळीसाठी व्यापा-यांच्या खळ्यावरील कामगार हे सुट्टीवर गावी जातात. त्यामुळे बाजार समितीत होणारे लिलाव बंद राहतात. दरम्यान आज शनिवार पासून लासलगाव बाजार समितीला जवळपास दहा दिवस सुट्टी राहणार आहे. त्यामुळे शेतक-यांना कांदा विक्रीसाठी आता दहा दिवस थांबावे लागणार आहे.

लासलगाव बाजार समितीत आज शनिवार पासून ते ३० ऑक्टोबर पर्यंत कांदा लिलाव बंद राहतील तसेच पाच दिवस धान्य भुसार मालाचे लिलाव देखील बंद राहतील. या कालावधीत शनिवार व रविवार च्या दोन सुट्ट्या आहे. मात्र पाच दिवस भाजीपाला लिलाव सुरू राहतील तसेच टोमॅटो हे नाशवंत पीक असल्याने टोमॅटो चे लिलाव बंद राहणार नसून सुट्टीच्या काळातील सर्व दिवस टोमॅटो चे लिलाव सुरू राहतील अशी माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे. याची नाेंद सर्व शेतकरी व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद appeared first on पुढारी.