नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत सिटीलिंक प्रवास

दिव्यांग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहराबाहेरील मात्र शिक्षणासाठी नाशिक महापालिकेच्या हद्दीत राहणार्‍या दिव्यांग विद्यार्थांना सिटीलिंकमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार 40 किंवा 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व ज्यांनी मोफत प्रवासाचा पास काढला आहे, अशा दिव्यांगांसाठी सुरू करण्यात आलेली ही सुविधा मंगळवार (दि.1) पासून सुरू झाली आहे. त्यासाठी सिटीलिंकतर्फे आतापर्यंत सुमारे 1,200 दिव्यांगांना मोफत प्रवासाचे पास वाटप करण्यात आले आहेत.

नाशिक महानगरपालिका हद्दीबाहेरील मात्र शहरात वास्तव्य करून शिक्षण घेणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांनादेखील मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. ज्या दिव्यांग विद्यार्थांना मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा आहे त्या दिव्यांग विद्यार्थांनी त्र्यंबक रोडवरील सिटीलिंक भवन या मुख्य कार्यालयात कागदपत्रे जमा करून मोफत पास काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मोफत पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधारकार्ड, बोनफाइड सर्टिफिकेट, नाशिक महानगरपालिका हद्दीत राहत असलेला पुरावा, दिव्यांग विद्यार्थ्याचा फोटो, दिव्यांग असल्याचे शासकीय प्रमाणपत्र ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत सिटीलिंक प्रवास appeared first on पुढारी.