नाशिक : दीड महिन्यात कृषिपंपांसाठी २८ हजार कनेक्शन

कृषिपंप,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांना अर्ज करूनही कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी थांबावे लागत आहे, हा प्रश्न महावितरणने नियोजनपूर्वक कारवाई करत सोडविला आहे. अवघ्या दीड महिन्यात २७ हजार ९८० नवे कनेक्शन देत शेतकऱ्यांच्या ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सोडविण्यासाठी गती दिली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

शेतकऱ्यांनी कृषिपंपांसाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी बराच वेळ थांबावे लागते. त्याला पेड पेंडिंगचा प्रश्न म्हणतात. शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. त्यानुसार महावितरणने विशेष नियोजन करून कारवाई सुरू केली.

महावितरणने दि. ३१ मार्च २०२२ अखेर कृषिपंपांनी वीज कनेक्शन मिळण्यासाठी प्रलंबित १ लाख ८० हजार १०६ अर्जांपैकी ८२ हजार ५८४ कनेक्शन एप्रिल ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत दिले आहेत. त्यापैकी २७,९८० कनेक्शन या नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरच्या 15 दिवसांत देण्यात आले आहेत. कृषिपंप वीज कनेक्शनसाठी महावितरणने नियोजन केले असून, अंमलबजावणीची गती वाढल्याने नवीन कनेक्शन देण्याचा वेग वाढला आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत आणखी एक लाख कृषिपंप कनेक्शन देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असणार आहे.

प्राधान्यक्रमाने कनेक्शन

कृषिपंपांसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज नव्याने दाखल होत आहेत. पण त्याचवेळी महावितरण पेड पेंडिंगचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना प्राधान्याने नवे कनेक्शन देत आहे. परिणामी राज्यात कृषिपंपांसाठी वीज कनेक्शन मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : दीड महिन्यात कृषिपंपांसाठी २८ हजार कनेक्शन appeared first on पुढारी.