नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
उपप्राचार्य हे रस्त्याने पायी जात असताना त्यांना दुचाकीने जोरदार धडक दिली. यात त्यांना जबरदस्त मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील महाराणी उषाराजे होळकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य संदीप कारभारी पवार (४७, रा. फुलेनगर) हे गणूर रस्त्याने चांदवडकडे पायी जात होते. त्यावेळी मागच्या बाजूने गणूरकडून चांदवडकडे भरधाव येणाऱ्या दुचाकीचालकाचे (क्र. एमएच १५, एचए ६१८२) नियंत्रण सुटून त्याने पायी चालणारे पवार यांना जोरदार धडक दिली. यात पवार रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला, कंबरेला जबरदस्त मार लागला होता. त्यांना तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यावर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेबाबत मृताचा चुलतभाऊ सुभाष माधव पवार (४६, रा. उसवाड) यांनी फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक कमल अहिरे या पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा:
- Punjab Kings XI IPL 2023 : पंजाब किंग्जला धक्का! ‘या’ इंग्लिश खेळाडूला मिळाली नाही ‘एनओसी’
- उस्मानाबाद : एक लाखाची लाच घेताना सरपंच पतीला अटक
- ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
The post नाशिक : दुचाकीच्या धडकेत उपप्राचार्य ठार appeared first on पुढारी.