नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

नाशिक

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथील इंदिरागांधी पुतळा जवळ घडली. मोहनलाल घनशाम केशवाणी (६२, रा. गोसावी मळा, नाशिकरोड) यांचा मृत्यू झाला आहे. मोहनलाल हे दुचाकीवरून रविवारी (दि.७) जात असताना त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि.९) सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू appeared first on पुढारी.