नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी

नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शेवटचे पाच दिवस देखाव्यांना रात्री बारापर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांना रात्री बारांपर्यंत देखावे पाहता येणार असून, ध्वनिक्षेपकही लावता येणार आहेत.

सोमवार (दि.5) ते शुक्रवार (दि.9) हे आदेश लागू राहणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत सूट देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निर्णय घेण्यासाठी शासनामार्फत प्राधिकृत केले आहे. त्यानुसार वर्षभरात दहा प्रुमख उत्सवांसाठी ध्वनिप्रदूषणाची पातळी न ओलांडता रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक लावता येत असतात. दरम्यान, गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी तीन दिवसांची वाढीव मुदत द्यावी, अशी मागणी मंडळांनी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी गंगाथरन यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करत गणेशोत्सव काळात तीन दिवस ध्वनिक्षेपक रात्री 12 पर्यंत वाजवण्यास परवानगी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी appeared first on पुढारी.