नाशिक: देवळा, उमराणे परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा

देवळा : पुढारी वृत्तसेवा : देवळा शहरासह वाजगाव, खर्डे, उमराणे परिसरातील चिंचवे येथे आज (दि. ९) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दुपारी साडे तीनच्या सुमारास चिंचवे येथे मोठ्या प्रमाणात, तर वाजगाव येथे किरकोळ प्रमाणत गारा पडल्या. या पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे.

रविवारी देवळा येथे आठवडे बाजार असल्याने अचानक अवकाळी पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे कांद्यासह इतर पिकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. नुकसानीचा तत्काळ पंचनामा करण्यात यावा. तसेच शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: देवळा, उमराणे परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.