Site icon

नाशिक : देवळा – वाखारी रस्त्यावर गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा वाखारी रोडवर अवैद्य गुटखा वाहतूक करणारे वाहन देवळा पोलिसांनी मुद्देमालासह जप्त केले. ही कारवाई आज (दि. १६) दुपारी दीडच्या सुमारास केली. प्रशांत आनंदा वाघ (वय ३५, रा. मोतीनगर, विठेवाडी रोड, ता. देवळा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन महिन्यांत ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.

याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील वघई येथून विक्रीसाठी गुटखा घेऊन वाहन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार देवळा वाखारी रस्त्यावर पोलिसांनी पाठलाग करून गुटखा असलेले वाहन जप्त करण्यात आले. यावेळी १८ लाख ६५ हजार २४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, ज्योती गोसावी, संदीप चौधरी करीत आहेत.

हेही वाचा 

The post नाशिक : देवळा - वाखारी रस्त्यावर गुटख्यासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Exit mobile version