नाशिक : दैवीशक्ती सिद्ध करा आणि मिळवा 50 लाखांचे बक्षीस : अंनिस

मालेगाव www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील भारत विद्यालयात आदिवासी व क्रांती दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सप्रयोग प्रत्येक घटनेमागील विज्ञान उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. दैवीशक्ती सिद्ध केल्यास समितीर्फे 50 लाखांचे बक्षीस देण्याचीही घोषणा केली.

मुख्याध्यापक के. एम. अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास बळिराजा आत्मसन्मान संस्थेचे अध्यक्ष जितेद्र वाघ उपस्थित होते. आदिवासी व अंधश्रद्धा यांचा संबंध स्पष्ट करताना शिंदे यांनी अनेक मनोरंजक प्रात्यक्षिके सादर केली. मानवाची उत्क्रांती व नंतर होत गेलेले बदल त्यांनी विषद केले. जादू म्हणजे हातचलाखी असते, हे त्यांनी प्रयोगातून दाखवले. यात अंगठी गायब करणे, पाणी न संपणे, रुमालाची काठी करणे असे वेगवेगळे प्रयोग करून भोंदूबाबा कसे फसवतात याची माहिती दिली. मंत्र, तंत्र हे पोट भरण्याचे साधन आहे. त्यामुळे कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, कुणी पाच लाख रुपये अनामत रक्कम संस्थेकडे ठेवून दैवीशक्ती असल्याचे सिद्ध केल्यास त्यास 50 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. दावा अयशस्वी झाल्यास अनामत जमा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

The post नाशिक : दैवीशक्ती सिद्ध करा आणि मिळवा 50 लाखांचे बक्षीस : अंनिस appeared first on पुढारी.