नाशिक : धनादेश न वटल्याने महिलेला दोन महिन्यांचा कारावास 

न्यायालय

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात धनोदश अनादर प्रकरणी महिलेला दोन महिन्यांचा कारावास तसेच धनादेश रकमेसह द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्याचा दंड अशी शिक्षा येवला न्यायालयाने ठोठावली आहे.

श्रीराम सिटी युनियन फायनान्सच्या येवला शाखेतून सहकर्जदार लक्ष्मीबाई गोरक्षनाथ एरंडे यांनी तीन लाखांचे व्यावसायिक कर्ज घेतले होते. त्याच्या परतफेडीसाठी लक्ष्मीबाई एरंडे यांनी 1 लाख 59 हजार 477 रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत अनादरित झाल्याने श्रीराम सिटी युनियन फायनान्सतर्फे येवला येथील न्यायालयात त्या विरोधात दावा दाखल केला होता. या संपूर्ण दाव्याची चौकशी करून साक्षी पुरावे तपासले असता लक्ष्मीबाई एरंडे दोषी आढळून आल्याने त्यांना न्यायधीश एस. बी. राठोड यांनी धनादेश रकमेसह धनादेश रकमेवर 9 टक्के व्याज धनादेश दिनांकापासून ते धनादेश रक्कम वसूल होईपर्यंत दंडाची रक्कम फिर्यादी संस्थेला देण्याचा व दोन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी श्रीराम सिटी युनियन फायनान्सतर्फे ॲड. तुषार सोमवंशी यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : 

The post नाशिक : धनादेश न वटल्याने महिलेला दोन महिन्यांचा कारावास  appeared first on पुढारी.