नाशिक : धारदार हत्यारे बाळगणारे दोघे जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धारदार हत्यारे बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेतील दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने पकडले आहे. अंकुश मोतीराम जाधव (२०), श्रीकांत सुरेश मुकणे (१९, दोघे रा. शेरेमळा झोपडपट्टी, पंचवटी) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पथकातील सहायक पोलिस निरीक्षक किरण रोंदळे व त्यांच्या पथकास गस्तीदरम्यान, गणेशवाडी उद्यानाजवळ काही संशयित धारदार हत्यारांसह येणाऱ्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अंकुश जाधव व श्रीकांत मुकणे यांना पकडले. त्यांच्याकडून चार कोयते व एक चॉपर आढळून आल्याने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, हवालदार विजयकुमार सुर्यवंशी, भाऊसाहेब क्षीरसागर, शेख कादीर, नाईक श्रीशैल सवळी, पोलिस अंमलदार कडूबा पाटील, संदीप डावरे, प्रफुल्ल गांगुर्डे, प्रविण चव्हाण, विशाल जोशी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : धारदार हत्यारे बाळगणारे दोघे जेरबंद appeared first on पुढारी.