नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

गोंदेगाव (ता. निफाड) येथील मका उत्पादक शेतकरी निवृत्ती आहेर या शेतकऱ्याच्या घराजवळ मक्याच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. 9) पहाटे सावजाच्या शोधात असलेला बिबट्या जेरबंद झाला आहे. नागरिकांना वारंवार दर्शन देत धुमाकूळ घालणारा हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गोंदेगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिंजरा लावण्याची मागणी केली जात होती. वनविभागाने पिंजरा लावताच त्यात बिबट्या जेरबंदहे. या बिबट्याला निफाड येथील नर्सरीत आणण्यात आले असून, बंदिस्त बिबट्या अंदाजे साडेतीन वर्षे वयाचा नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या बिबट्याची तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या झाला जेरबंद appeared first on पुढारी.