Site icon

नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील वस्त्र धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून ६७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. याबाबत संबंधित ठेकेदाराने पैसे परत देण्यास मुदत मागितली आहे. तर शासनाने ३७ लाखांचे बिल रोखून ठेवले आहे. त्यानुसार रोखून ठेवलेले बिल धनादेशामार्फत (डीडी) शासनाच्या खात्यात आज (दि.२२) जमा होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

बिलांमध्ये फेरफार करून ठेकेदाराने तीन वर्षांत ६७ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीतून उघड झाले. त्यापैकी ३० लाखांचे बिल ठेकेदारास देण्यात आले असून, उर्वरित बिलाची रक्कम रोखून ठेवण्यात आली आहे. त्यानुसार रोखून ठेवलेली रक्कम डीडीमार्फत शासन खात्यात जमा केली जाईल, तर ३० लाखांची रक्कम परत करण्यासाठी ठेकेदाराने मुदत मागितली आहे. त्यावर येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा appeared first on पुढारी.

Exit mobile version