नाशिक : नववे अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन आजपासून

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत असून, प्रा. फकरूद्दीन बेन्नूर नगरी दादासाहेब गायकवाड सभागृहात संमेलन होणार आहे. अध्यक्षपदी अब्दुल कादर मुकादम, तर उद्घाटक म्हणून पत्रकार आरफा खानम शेरवानी उपस्थित असणार आहेत.

आज (दि.२८) सकाळी ८ वाजता उद्घाटन व पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. पहिला परिसंवाद दुपारी २ वाजता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुस्लीम : प्रश्न वास्तव आणि अपेक्षा या विषयावर होणार असून, अध्यक्षस्थानी प्रा. फ. म. शहाजिंदे असणार आहेत. दुसरा परिसंवाद दुपारी ३ वाजता साहित्य व सांस्कृतिक दहशतवाद या विषयावर होणार असून, अध्यक्षस्थानी नागपूर येथील प्रा. जावेदपाशा कुरेशी असणार आहेत. सायंकाळी ६ वाजता फातिमाबीच्या लेकींचे कविसंमेलन होणार असून, फरजाना डांगे अध्यक्षस्थानी तर रजिया दबीर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. रात्री ७.३० वाजता संमेलन अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. रात्री ९ वाजता बहुभाषिक कविसंमेलन व मुशायरा कार्यक्रम होणार आहे. सोलापूर येथील कवी मुबारक शेख अध्यक्षस्थानी असणार आहे.

(दि. २९) परिसंवाद तिसरा सकाळी ८.३० वाजता मुस्लीम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके : साहित्यिक, सांस्कृतिक व समाजिक अन्वनार्थ या विषयावर होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. अजीज नदाफ असणार आहेत. चाैथा विशेष परिसंवाद दुपारी १ वाजता आम्ही भारताचे लोक या विषयावर होणार आहे. चांदवड येथील डॉ. अलीम वकील अध्यक्षस्थानी असतील. पाचवा परिसंवाद दुपारी २ वाजता वर्तमान स्थितीतील मुस्लीम मराठी साहित्यामधील सामाजिक व सांस्कृतिक वेध या विषयावर होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण असणार आहे. संमेलनाचा समारोप समारंभ ४ वाजता होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत हुसेन दलवाई, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रतिमा परदेशी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : नववे अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन आजपासून appeared first on पुढारी.