नाशिक : नांदगांव तालुका ग्रामसेवक युनियनच्या तालुका अध्यक्षपदी दिलीप निकम

पंचायत समिती नांदगाव www.pudhari.news

नाशिक (नांदगाव) : प्रतिनिधी

नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियन डी एन १३६ अंतर्गत नांदगाव तालुक्यात ग्रामसेवक युनियनची सन २०२२- २०२७ ची कार्यकारणी निवडीबाबत बुधवार, दि. २८ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात विस्तार अधिकारी देवीप्रसाद मांडवडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नवीन नियुक्त करण्यात आलेल्या नांदगाव तालुका युनियनचे अध्यक्षपद दिलीप निकम तर सचिवपदी रविंद्र काकळीज (पाटील) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तसेच कार्यकारीणीमध्ये कार्याध्यक्षपदी शरद मोहिते, उपाध्यक्षपदी बिरुनाथ गेंद, महिला उपाध्यक्षपदी विनया वैद्य, सहसचिवपदी सतिष शिंदे, कोषाध्यक्षपदी सुनिल मोकळ, संघटकपदी बबन राठोड, महिला संघटकपदी हिमगौरी आहेर, कायदेशीर सल्लागारपदी डॉ. गोकुळ खैरनार, प्रसिद्धीप्रमुखपदी पवन थोरात, लेखापरीक्षकपदी नंदकुमार अमृतकर आदींची नियुक्ती करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी स्वागत केले. तसेच मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसेवक युनियनचे मिलिंद सोनवणे, रवी शेलार यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

हेही वाचा:

The post नाशिक : नांदगांव तालुका ग्रामसेवक युनियनच्या तालुका अध्यक्षपदी दिलीप निकम appeared first on पुढारी.