Site icon

नाशिक : नांदगावच्या एसटी कॉलनीतून ९ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव एसटी कॉलनी येथून ९वर्षीय मुलगा हा मंगळवार, दि.२९ नाेव्हेंबरपासून बेपत्ता झाल्याची तक्रार नांदगाव पोलीस ठाण्यात मदरसा कर्मचारी सिकंदर शब्बीर शेख यांनी दाखल केली होती. त्यानंतर नांदगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नांदगाव एस. टी. कॉलनीतील रौजतुल उलुम मदरसा येथून दुपारी १ च्या सुमारास विद्यार्थी इमरान मोहम्मद हनीफ अन्सारी (९, रा. सिद्धार्थनगर, शांतीनगर, अशरफिया ता. भिवंडी, जि. ठाणे, हल्ली मुक्काम एस.टी. कॉलनी नांदगाव) हा कोणाला काहीही न सांगता निघून गेला. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले असावे असा अंदाज व्यक्त करुन पेालीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बेपत्ता मुलाची उंची – ०४ फुट, रंग – सावळा, अंगात – सफेद रंगाचे नेहरू शर्ट व सफेद रंगाची पॅंट, डोक्यात – सफेद रंगाची टोपी, पायात चप्पल, गळयात काळा धागा त्यात पेटीची चावी लावलेली, बोली भाषा – हिंदी असून या वर्णनाचा मुलगा कोणास दिसल्यास नांदगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन नांदगाव पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : नांदगावच्या एसटी कॉलनीतून ९ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता appeared first on पुढारी.

Exit mobile version