नाशिक : नावा चषकाचा उत्साहात समारोप

नावा चषक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ॲडव्हर्टायझिंग ॲण्ड वेल्फेअर असोसिएशन (नावा) तर्फे माध्यम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित ‘नावा प्रीमियर लीग (एनपीएल) नावा चषक पुण्यनगरी संघाने पटकावला. लोकनामा संघाने दिलेल्या ५७ धावांचे लक्ष्य एक गडी गमावून अवघ्या ५ षटकांत गाठले. सम्राट ग्रूपचे सुजॉय गुप्ता यांच्या हस्ते विजेत्या संघाला नावा चषक देण्यात आला. महात्मानगर येथील मैदानावर दोन दिवस रंगलेल्या सामन्यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. या सामन्यांत नाशिकमधील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधील १२ संघ सहभागी होते.

या स्पर्धांचे मुख्य प्रायोजक सम्राट ग्रुप होते. सहप्रायोजक आयव्होक ऑप्टिकल अ‍ॅण्ड विजन केअर, युनिफाॅर्म पार्टनर मधुरा ग्रुप, ट्रॉफी पार्टनर सिंग वाॅरियर्स व मीडिया अ‍ॅडव्हर्टायझिंग,गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्ट्स, फूड्स पार्टनर एन. राका. अ‍ॅडव्हर्टायझिंग, नवांकुर पब्लिसिटी, पेटूमल, टॉस पार्टनर मयूर अलंकार, पिंगळे पब्लिसिटी, मॉ अ‍ॅडव्हर्टायझिंग, एखंडे अ‍ॅण्ड असोसिएट, गंगोत्री इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, श्री साक्षी अ‍ॅडव्हर्टायझिंग, प्रतिबिंब आर्ट इफेक्ट, कृषिदूत बायो हर्बल, ओेमपूजा इलेक्ट्रॉनिक, वेध न्यूज यांचे विशेष सहकार्य लाभले. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी यासाठी ग्राउंड उपलब्ध करून दिले होते. दरम्यान, रविवारी (दि. 2) उपांत्यपूर्व सामना देशदूत आणि लोकनामा यांच्यात होऊन लोकनामाने देशदूतचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना लोकनामा आणि पुण्यनगरी यांच्यात झाला. त्यात पुण्यनगरी संघाने बाजी मारली.  स्पर्धा समितीप्रमुख रवि पवार, सचिन गिते व नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, सरचिटणीस दिलीप निकम, मिलिंद कोल्हे पाटील, राजेश शेळके, विठ्ठल देशपांडे, गणेश नाफडे, दीपक जगताप, प्रताप पवार, श्रीकांत नागरे, सुनील महामुनी, अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, शैलेश दगडे, श्याम पवार, नितीन शेवाळे, दिनेश गांधी, रविराज खैरनार व नावाचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी स्पर्धेसाठी प्रयत्नशील होते. स्पर्धेचे समालोचन राजू कुलकर्णी यांनी केले.

The post नाशिक : नावा चषकाचा उत्साहात समारोप appeared first on पुढारी.