नाशिक : ‘नावा प्रीमियर लीग’ची घोषणा; दोन दिवस रंगणार सामना

nava www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्या वतीने यावर्षीही ‘नावा प्रीमियर लिग’ टी-10 इंटरमीडिया क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 18 व 19 मार्च 2023 रोजी सकाळी 8 पासून महात्मानगर येथील मैदानावर रंगणार आहेत.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नावनोंदणी 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धांचे हे 16 वे वर्ष आहे. स्पर्धा संस्मरणीय व्हाव्यात यासाठी सर्व नावा सदस्य प्रयत्नशील आहेत. स्पर्धेत विजयी संघाला नावा चषक प्रदान केला जातो. शिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरिज यासारखी अनेक बक्षिसे दिली जातात. माध्यम जगतामध्ये या स्पर्धेविषयी विशेष औत्सुक्य असते. स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा क्रिकेट स्पर्धा समितीप्रमुख रवि पवार, सचिन गिते व संस्थेचे अध्यक्ष प्रवीण चांडक यांनी केली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोतीराम पिंगळे, नितीन राका, दिलीप निकम, मिलिंद कोल्हे-पाटील, राजेश शेळके, गणेश नाफडे, दीपक जगताप, श्रीकांत नागरे, विठ्ठल देशपांडे, अमोल कुलकर्णी, साहिल न्याहारकर, विठ्ठल राजोळे, दिनेश गांधी, सुनील महामुनी, श्याम पवार, सुभाष लगली, तन्मय जोशी, अभिजित चांदे, विजय सोपारकर, मंगेश सूर्यवंशी, महावीर गांधी, नितीन शेवाळे, प्रवीण मराठे, किशोर खैरनार, सतीश बोरा, महेश कलंत्री आदींचे सहकार्य मिळत आहे. शहरातील सर्व प्रसिद्धिमाध्यमे, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच जाहिरात संस्थांचा या स्पर्धेमध्ये सहभाग असतो. सहभागी होऊ इच्छिणार्या सर्व संघांनी रवि पवार व सचिन गिते यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन ‘नावा’च्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘नावा प्रीमियर लीग’ची घोषणा; दोन दिवस रंगणार सामना appeared first on पुढारी.