Site icon

नाशिक : ‘ना नफा, ना तोटा’ गणेशमूर्ती विक्री केंद्रे

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवानिमित्त नागरिकांसाठी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर गणेशमूर्ती विक्री केंद्रांचा प्रारंभ त्रिमूर्तीनगर, हिरावाडी रोड येथे माजी प्राचार्य हरीश आडके व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

जीएसटी व वाढत्या महागाईच्या झळा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांची आर्थिक बचत व्हावी, या द़ृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून त्रिमूर्तीनगर मित्रमंडळ व मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ना नफा, ना तोटा’ गणेशमूर्ती विक्री केंद्रांचा निर्णय घेण्यात आला. अंबादास खैरे यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पारंपरिक सण साजरे करत असताना या उपक्रमामुळे यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांना वाढत्या महागाईतून थोडी सवलत मिळेल, असे मत हरीश आडके यांनी व्यक्त केले. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खैरे यांनी केले आहे. यावेळी राजू व्यास, विठ्ठल निकम, गणेश शिंदे, अशोक जगताप, मनोहर आव्हाड, विनायक वाघ, नितीन वाघ, अनिल मराठे, अमर तांबे, संदीप खैरे, पुरुषोत्तम शिंदे, राज रंधवा, अमोल सोनवणे, रोहित जाधव, जयदीप सोळंकी, मनोज मुंढे, शुभम पाटील, प्रकाश आव्हाड, विनायक जाधव, गोटू इंगोले, रुपेश झा आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘ना नफा, ना तोटा’ गणेशमूर्ती विक्री केंद्रे appeared first on पुढारी.

Exit mobile version