नाशिक : निफाडच्या लोकन्यायालयात 1017 प्रकरणांचा निपटारा

लोकन्यायालय www.pudhari.news

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा
निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात एकूण 1017 प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली असून, एकूण 11 कोटी 27 लाख रुपयांची वसुली झाली.

निफाड न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश अजय गुजराथी, निफाडचे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. पवार, निफाडचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. टी. काळे, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाय. डी. बोरावके, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. एल. सराफ, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा समित्यांद्वारे लोकन्यायालयाचे कामकाज झाले. अ‍ॅड. सुनील शेजवळ, अ‍ॅड. रामनाथ शिंदे, अ‍ॅड. एन. डी. आहेर, अ‍ॅड. रेखा सुराशे, अ‍ॅड. भावना चोरडिया, अ‍ॅड. अभिलाषा दायमा हे सदस्य समितीत होते. लोकन्यायालयात वादपूर्व 8845 प्रकरणे विचारासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 714 प्रकरणांत सामोपचाराने तडजोड करण्यात आली. यातून तीन कोटी 59 लाख 14 हजार 602 रुपयांची वसुली झाली. न्यायालयात प्रलंबित असलेल्या 2492 प्रकरणांपैकी 303 प्रकरणांत यशस्वी तडजोड करण्यात आली. सात कोटी 67 लाख रुपयांची वसुली झाली. अशा प्रकारे निफाडच्या लोकन्यायालयात वादपूर्व व न्यायप्रविष्ट अशा एकूण 1017 प्रकरणांत तडजोड करण्यात आली. त्यातून एकूण 11 कोटी 27 लाख रुपयांची वसुली झाली. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी निफाड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अंबादास आवारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. शरद नवले, सेक्रेटरी अ‍ॅड. रामेश्वर कोल्हे, खजिनदार अ‍ॅड. चेतन घुगे, सदस्य अ‍ॅड. गौरव शिंदे, अ‍ॅड. बबन सोनवणे, अ‍ॅड. योगिता जाधव आदींसह न्यायालयीन कर्मचारीवर्ग, वकील, विविध बँका, विमा कंपनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post नाशिक : निफाडच्या लोकन्यायालयात 1017 प्रकरणांचा निपटारा appeared first on पुढारी.