नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी

निवास न्याहारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वर्षा पर्यटनासाठी विविध शहरांतून सहकुटुंब ग्रामीण भागात दाखल होणार्‍या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीच्या ‘निवास-न्याहारी’ योजना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. खिशाला परवडणारे दर आणि चोख व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. शहरी भागांतून येणार्‍या पर्यटकांसाठी ग्रामीण भागाचा अनुभव घेता येत असल्याने ‘निवास-न्याहारी’ला वाढती पसंती मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर आदी परिसर पर्यायी लोणावळा म्हणून ओळखले जातो. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर वर्षा सहलीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. एमटीडीसीच्या निवास व न्याहारी योजनेमुळे घोटी, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या भागांत मुंबईकडून येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्टार कॅटेगरीत निवास-न्याहारी योजनाधारकांच्या पूरक सुविधांना दर्जा देण्याचे कामही केले जात असल्याने पर्यटकांकडून प्राधान्य दिले जात आहे.

पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे ‘निवास-न्याहारी’ तसेच ‘महाभ्रमण’ या दोन योजनांच्या माध्यमातून स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळले आहे. ‘निवास-न्याहारी’च्या माध्यमातून स्थानिकांच्या रिकाम्या जागांचा फायदा करून घेण्यात येत आहे. विशेषत: घरातील महिलांसाठी ही रोजगाराची चांगली संधी आहे. पर्यटकांना स्थानिकांसमवेत राहण्याची, त्यांची संस्कृतीची ओळख होत आहे. स्वच्छ व घरगुती व्यवस्थेमुळे पर्यटकांचाही ओढा वाढत आहे.

वन्यजीव विभागाकडूनही चाचपणी
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा, रंधा धबधबा, कळसूबाई शिखर या ठिकाणी पावसाळ्यातच पर्यटकांची गर्दी होते. या ठिकाणी पर्यटकांची उत्तम प्रकारे राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी ‘होम स्टे’ अथवा ‘निवास-न्याहारी’ केंद्र सुरू करण्याबाबत वन्यजीव विभागाकडून चाचपणी केली जात आहे. प्रत्येक बीटमध्ये एक केंद्र देण्याचा विचार वन्यजीव विभागाकडून सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी appeared first on पुढारी.