नाशिक : निवृत्तिनाथांच्या वारीसाठी आरोग्य पथक देणार २४ तास सेवा 

नाशिक संतनिवृत्तिनाथ वारी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज उत्सवानिमित्त होत असलेल्या पौष वारीसाठी जिल्हा परिषदेमार्फत २४ तास आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील ५ अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे निवृत्तिनाथ महाराज मंदिराजवळ सेवा देणार आहेत.

जिल्हा परिषदेने याबाबत दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, पौष एकादशीनिमित्त होत असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी राज्यभरातून वारकरी पायी येत असतात. त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्यांना सोयीचे व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे २ समुदाय वैद्यकीय अधिकारी, १ आरोग्यसेवक, १ आरोग्यसेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे आरोग्य अधिकारी कर्मचारी संत निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या जवळ रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक, कर्मचारी व औषधसाठ्यांसह उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : निवृत्तिनाथांच्या वारीसाठी आरोग्य पथक देणार २४ तास सेवा  appeared first on पुढारी.