नाशिक : न्यायालयाचे वॉरंट ; कार्यकारी अभियंत्याची खुर्ची, संगणक जप्त

न्यायालय www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कंत्राटदाराची थकीत नुकसानभरपाईची रक्कम दिली नाही, त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या जंगम जप्ती वॉरंटप्रमाणे नाशिकरोडच्या महसूल कार्यालयातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची आणि संगणक जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

नाशिकरोड महसूल आयुक्त कार्यालयाच्या परिसरात पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे नाशिक जिल्हा कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत पेठ तालुक्यातील टप्पा चारच्या दोन कामांचा समावेश आहे. हे काम नरसिम्हा कन्स्ट्रक्शनचे मोहन काळे यांना दिले होते. काम असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत पंतप्रधान ग्रामसडक योजना नाशिक विभागाने कंत्राटदाराविरोधात नुकसानभरपाई आकारली होती. त्याचप्रमाणे मक्ता तीन – क रद्द करण्यात आला होता. या कार्यवाहीविरोधात मोहन काळे यांनी सन 2009 मध्ये तीन कोटी सहा लाख 45 हजार रुपयांचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने कंत्राटदाराच्या बाजूने निकाल दिला. दरम्यान, मोहन काळे यांनी न्यायालयात स्पेशल दरखास्त दाखल केला होता. काळे यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रक्कम न मिळाल्याने जंगम जप्ती वॉरंट बजाविण्यात आले होते. त्याप्रमाणे गुरुवारी (दि.6) कार्यकारी अभियंत्याची खुर्ची तसेच संगणक जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा :

The post नाशिक : न्यायालयाचे वॉरंट ; कार्यकारी अभियंत्याची खुर्ची, संगणक जप्त appeared first on पुढारी.