नाशिक : पंचवटी विभागातील पाणी पुरवठा सोमवारी बंद

जल

नाशिक : पंचवटी विभागातील आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ भरणाऱ्या उर्ध्ववाहिनीला पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रामधील आवारात क्रॉस कनेक्शन करावयाचे असल्याने हे काम सोमवारी (दि.२३) हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पंचवटी विभागातील प्रभाग क्र. ४, ५ व ६ मधील परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ यावरुन संबंधित तिन्ही प्रभागांना पाणी पुरवठा केला जातो. दुरूस्तीचे काम हाती घ्यायचे असल्याने जुना पंचवटी गावठाण परिसर, सेवाकूंज, गजानन चौक, गुरूद्वारा रोड, ढिकले नगर, सरदार चौक, नाग चौक, सिता गुंफा रोड, काळाराम मंदिर परिसर ते शनिचौक, सुकेनकर लेन, पंचवटी राजवाडा, आर. पी. टाकी परिसर, वाल्मिकनगर, संजय नगर, वाघाडी लगतचा परिसर, गजानन कॉलनी, वाघ मळा, जगझाप मार्ग व मखमलाबाद रोडलगतचा परिसर, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, नवनिर्माण चौक, उदय कॉलनी, कृष्णगनर, ड्रिमकॅसल परिसर, जाणता राजा कॉलनीचा काही परिसर, क्रांतीनगर, शिंदे मळा, वृंदावन नगर, प्रोफेसर कॉलनी, नागरे मळा, मोरे मळा, हनुमानवाडी, चौधरी मळा, तुळजाभवानी नगर, समर्थ नगर या परिसरातील सोमवारी (दि.२३) सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

मंगळवारी (दि.२४) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याबाबत परिसरातील नगरिकांनी नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : पंचवटी विभागातील पाणी पुरवठा सोमवारी बंद appeared first on पुढारी.