नाशिक पदवीधरच्या मतमोजणी दरम्यान गोंधळ, काही काळ थांबवावी लागली मतमोजणी…

नाशिक पदवीधर निवडणूक,www.pudhari.news

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीला मतपत्रिकांच्या छाननीनंतर सुरुवात झाली आहे. मात्र, दरम्यान मतमोजणी केंद्रात उमेदवार प्रतिनिधी जास्त झाल्याने या ठिकाणी काही काळ गोंधळ उडाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे काही काळ मतमोजणी प्रक्रिया देखील थांबविण्यात आली होती.

सय्यद प्रिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर मतमोजणी सुरु आहे. 13 नंबरच्या टेबलवर काउंटिंग करताना हा प्रकार घडला. उमेदवारांच्या प्रतिनिधींना खूर्च्या कमी पडल्याने एकमेकांना धक्का लागून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पहिल्याच फेरीत असा गोंधळ उडाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी तत्काळ या प्रकाराची दखल घेत पोलिसांना पाचारण केले. पोलिसांच्या मध्यस्थींने हा वाद मिटवून पोलिसांनी जास्त झालेल्या उमेदवार प्रतिनिधींना बाहेर काढले आहे. यावेळी प्रचंड गोंधळ उडाल्याने काही काळ मतमोजणी प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर मतमोजणीला पुन्हा सुरुवात झाली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक पदवीधरच्या मतमोजणी दरम्यान गोंधळ, काही काळ थांबवावी लागली मतमोजणी... appeared first on पुढारी.