Site icon

नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क 

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान सुरु आहे. सकाळी आठ वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत अवघे 30 टक्के तर विभागात 31.71 टक्के इतके मतदान झाले आहे.

4 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार असून आता केवळ अर्ध्या तासाचा अवधी उरला आहे. विभागातील एकूण ३३८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नाशिक जिल्ह्यात ९९ मतदान केंद्रे आहेत. विभागात पदवीधर मतदारांची संख्या २ लाख ६२ हजार ७३१ इतकी आहे. सर्वाधिक मतदार हे नगर जिल्ह्यातील असून, त्यांची संख्या १ लाख १५ हजार ६३८ आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये ६९ हजार ६५२, जळगावला ३५ हजार ५८, धुळ्यात २३४१२, तर नंदुरबारमध्ये १८९७१ मतदार आहेत.

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने पदवीधरचा सामना सर्वार्थाने वेगळा ठरला आहे. निवडणुकीत प्रचारासाठी सोळाही उमेदवारांनी मागील १५ दिवसांपासून पाचही जिल्हे पिंजून काढले. त्यामुळे मतदारांचा कौल महत्वाचा असणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत 'इतके' टक्के मतदान appeared first on पुढारी.

Exit mobile version