नाशिक पदवीधर निवडणूक : आता लढाई पाटील विरुद्ध तांबे अशीच..’किती’ उरले रिंगणात?

शुभांगी पाटील, सत्यजीत तांबे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आजच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण सहा उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता एकुण 16 उमेदवार असणार आहेत.

आजच्या माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून कॉंग्रेस व भाजप या दोनही पक्षांचा एकही अधिकृत उमेदवार नसल्याने आता मुख्य लढत ही प्रामुख्याने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे व शुभांगी पाटील यांच्यातच होणार हे स्पष्ट झाले आहे.

कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला. त्यातच सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला. त्यानंतर सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली. सुधीर तांबे यांच्यापाठोपाठ आता सत्यजीत तांबे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असून पक्ष त्यांच्यावर अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने कारवाई करण्याची शक्यता आहे.

तसेच आज सकाळपासूनच शुभांगी पाटील या नॉट रिचेबल असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मुंबई येथे मातोश्रीवर पर्वा झालेल्या बैठकीत शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला. मात्र ठाकरे गटात शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन दोन मतप्रवाह निर्माण झाल्याचे कळते आहे.

या उमेदवारांनी घेतली माघार

अमोल खाडे
सुधीर तांबे
धनंजय जाधव
दादासाहेब पवार
राजेंद्र निकम
धनराज विसपुते

हेही वाचा :

The post नाशिक पदवीधर निवडणूक : आता लढाई पाटील विरुद्ध तांबे अशीच..'किती' उरले रिंगणात? appeared first on पुढारी.