नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि.३०) शांततेत मतदान पार पडले. नाशिक शहरात विविध मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. बहुतांक्ष केंद्रांवर मतदार यादीत नाव शोधण्या साठी मतदारांची धावपळ  होत आहे. दरम्यान, केंद्राबाहेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या समर्थकांनी उभारलेल्या बुथवर नाव शोधण्यसाठी मतदारांनी गर्दी केली.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. विभागातील पाचही जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता हे मतदान पार पडल्यामुळे यंत्रणे सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, दुसरीकडे नाशिकमध्ये मतदान केंद्र व यादीतील नाव शोेधण्यासाठी पदवीधरांची दमछाक झाली. मतदानासाठी एका केंद्रांवर गेलेल्या मतदारांना त्यांचे नाव भलत्याच केंद्रातील यादीत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नविन केंद्र गाठताना मतदारांची धांदल उडाली.

मतदार यादीतून मतदारांना त्यांचे नाव शोधून देण्यासाठी शहरातील प्रत्येक केंद्राबाहेर तांबे व पाटील यांच्या समर्थकांनी बुथ ऊभारले. या बुथवर लॅपटाॅप, इंटरनेटची वायफाय कनेक्टिव्हीसह यंत्रणा सज्ज होते. त्यामुळे मतदारदेखील या बुथवर जाऊन त्यांचे केंद्र व यादीतील नावाची पुष्टी करून घेताना दिसले. दरम्यान, हे दोन उमेदवार वगळता उर्वरित १४ उमेदवारांची प्रचार यंत्रणा कोठेही निदर्शनास आली नाही. विशेष म्हणजे या दोन्ही बुथवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी दिवसभर चहा-नाश्त्या ते सुग्रास भोजनाचा आनंद लुटला.

बीएलओ बसूनच…
मतदारांच्या सुविधेसाठी जिल्हा निवडणूक शाखेने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार यादीसह बीएलओंची नियुक्ती केली. परंतू, हे बीएलओ केंद्राच्या आतील परिसरात उपलब्ध होते. त्यामुळे मतदार हे बाहेरच उमेदवारांच्या बुथवर यादीत नाव शोधताना पाहायला मिळाले. परिणामी प्रशासनाने यंत्रणा उभी करूनदेखील बीएलओंच्या नशिबी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत बसून राहणे आहे.

हेही वाचा:

The post नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ appeared first on पुढारी.