नाशिक पदवीधर निवडणूक : ‘स्वराज्य’चा झेंडा फडकणार – छत्रपती संभाजी महाराज यांचा दावा

छत्रपती संभाजी राजे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश भीमराव पवार यांनी जाहीरनामा नोटरी करून छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केला. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 चे 30 जानेवारी रोजी मतदान होत असून, श्री. सुरेश भीमराव पवार हे स्वराज्य संघटनेमार्फत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत असून, मतदारांनी अनु. क्रमांक दोन वरील सुरेश भीमराव पवार यांना पसंती क्रमांक एकचे मतदान करावे, असे आवाहन स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केले. उमेदवार सुरेश भीमराव पवार लोकशाहीचा मार्ग अवलंबून मतदारांनी केलेल्या आग्रहानुसार व कोल्हापूर येथील राजे छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेल्या आशीर्वादानुसार या निवडणुकीस सामोरे जात असून, त्यांना पाचही जिल्ह्यांतून प्रचाराच्या रणधुमाळीत शेवटच्या क्षणापर्यंत मतदार व विविध सर्वसंस्था यांचा निःस्वार्थीपणे जाहीर पाठिंबा मिळत आहे.

त्यानुसार पवार यांनी सांगितले की, वेगवेगळ्या पक्षाच्या अनेक निवडणुका व उमेदवार उमेदवारी करत असताना जाहीरनामा देत असतात; पण निवडून आल्यावर सदर जाहीरनामा ते विसरत असतात. परंतु मी छत्रपतींच्या नावाने ‘स्वराज्य’ या नावाने छत्रपतींच्या विचारा ने निवडणूक लढवीत आहे. या निवडणुकीत मी छत्रपतींच्या नावाने कुठलेही खोटे आश्वासन देणार नाही आणि मी जे आश्वासन दिले ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि जर मी ते पूर्ण करू शकलो नाही तर मी माझ्या आमदारपदाचा राजीनामा देऊन व आमदार यास मिळत असलेल्या पेन्शनचा कायमस्वरूपी त्याग करेल, असे आवाहन स्वराज्य संघटनेचे उमेदवार श्री. सुरेश भीमराव पवार यांनी जनतेस केले व त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र नोटरी करून छत्रपती संभाजीराजे यांना समस्त जनतेच्या साक्षीने दिले जाहीरनाम्यात प्रामुख्याने 2005 पासून बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करेन. वेळप्रसंगी आंदोलन उभे करून त्या शिक्षकांना न्याय मिळवून देणार, सीएचबी तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करणार, ‘एमपीएससी’, ‘यूपीएससी’ या स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक जिल्ह्यात विनाशुल्क मार्गदर्शन केंद्र उभारणार सरळ सेवाभरती परीक्षेत नियमितता आणून निकाल वेळेत लावावा यासाठी कायमस्वरूपी तरतूद करणार, अंध, अपंग, मूकबधिर शाळा व त्यांचे शिक्षक यांच्या प्रत्येक अडीअडचणी समजून त्या निवारण्यासाठी कटिबद्ध, राहणार असून, उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘कमवा व शिका’ योजना लागू करणार, प्राध्यापकांची रखडलेली भरतीप्रक्रिया वरिष्ठ पातळीवर मागणी करून जलद गतीने चालू ठेवणार, किमान कौशल्य शिक्षण मिळावे म्हणून ‘आयटीआय’ संस्था वाढवणार आदी महत्त्वपूर्ण बाबींबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, निवडून आल्यास सदर जाहीरनाम्याचे पालन न केल्यास राजीनामा देणार, अशी पवार यांनी नोटरी करून दिलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

यासाठी मी दिलेल्या आश्वासनानुसार वचनाप्रमाणे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदवीधर व कर्मचार्‍यांचे प्रश्न व समस्या निश्चितपणे सोडवेल, आपण मला तुमच्या सेवेची संधी दिल्यास मी प्रत्येक मुद्द्यावर विधान परिषदेत प्रश्न मांडून व आवाज उठवून नक्कीच सोडविण्यासाठी जीवाचे रान करीन आणि सदैव प्रयत्नशील राहून यशस्वी करून दाखवेल. त्यामुळे मला संधी देऊन तुमचा सर्वसामान्य उमेदवार म्हणून प्रथम प्रसंतीचे मत देऊन विजयी करावे, ही नम्र विनंती, असे आवाहन उमेदवार श्री. सुरेश भीमराव पवार यांनी केले.

लोकशाहीच्या क्रांतीचा नवा सूर्य पाहण्यासाठी पदवीधर व सर्वसामान्यांचा आमदार म्हणून सुरेश भीमराव पवार यांना नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून अ. नु. क्रमांक 2 वरील श्री. सुरेश भीमराव पवार यांना पसंती क्रमांक एकचे मतदान करून प्रचंड मतांनी निवडून दिल्यास सर्वसामान्य मतदार व सर्वसामान्य उमेदवार यांची खरी लोकशाही उदयास येणार आहे. स्वराज्यात फक्त आणि फक्त पदवीधरांच्या विकासाचीच बात व्हावी यासाठी आम्ही छत्रपतींचा वारस असल्याने सुरेश भीमराव पवार यांना पाठिंबा दिला आहे – छत्रपती संभाजीराजे.

हेही वाचा:

The post नाशिक पदवीधर निवडणूक : ‘स्वराज्य’चा झेंडा फडकणार - छत्रपती संभाजी महाराज यांचा दावा appeared first on पुढारी.