नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांचा मोठा विजय

Satyajeet Tambe Win

नाशिक; पुढारी ऑनलाईन : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून अखेर अपेक्षेप्रमाणे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. त्या पहिल्या फेरीपासूनच सत्यजित तांबे यांच्यापेक्षा मतांनी पिछाडीवर होत्या. प्रत्येक फेरीअंती दोघांमधील तफावत आणखी वाढतच होती. सत्यजीत तांबे यांनी पहिल्या पसंतीची ६८९९९ इतकी मते मिळवली. तर शुभांगी पाटील यांना ३९५३४ मते पडली. पुन्हा एकदा नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे कुटुबियांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (Satyajeet Tambe Win)

अधिक वाचा :

The post नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांचा मोठा विजय appeared first on पुढारी.