नाशिक : परदेशी विद्यार्थ्यांना ‘एसएमबीटी’त वैद्यकीय शिक्षणाचे धडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये 20 दिवसांपासून विविध देशांतील नऊ विद्यार्थी वेगवेगळ्या देशांत रुग्णांवर होत असलेल्या उपचारपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आले होते. या विद्यार्थ्यांमध्ये अ‍ॅडम डूकोविच (स्लोव्हाकिया), अलिसा फर्नांडिज (स्पेन), ज्युलिया कोनाट (पोलंड), मॅरियम अल्बाना (बहारीन), नौर होश्याम  इल्वाकील (इजिप्त), मार्ता पेरीज कॅब—ेरा (स्पेन), युरी सिल्वा (ब—ाझील), अ‍ॅमा (इस्टोनिया) या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे, एसएमबीटी मेडिकल कॉलेजचे चार विद्यार्थी फ—ान्स, इटली आणि स्पेनमध्ये नुकतेच जाऊन आले. यात आर्यमन सिंग आणि अथर्व देवकर हे फ—ान्समध्ये तर स्वराली खेडकर इटलीत आणि जान्हवी पारकर स्पेनमध्ये जून आणि जुलै महिन्यात जाऊन आल्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या देशात रुग्णांवर होत असलेल्या उपचारपद्धतींचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांना एका संशोधन प्रकल्पावर यादरम्यान काम करावे लागते. या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या संशोधनाच्या क्षेत्रात ज्ञान वाढविण्याची संधी मिळते. हा कार्यक्रम वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठांच्या माध्यमातून राबविला जातो.

एसएमबीटी मेडिकल कॉलेजमधील डॉ. श्याम अष्टेकर, डॉ. संजय जाधव,  डॉ. नीरज मोरे, डॉ. किरण राजोळे, डॉ. लीना जैन या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. या संपूर्ण प्रकल्पाला एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता आणि एमएसएआय-एसएमबीटीच्या सचिव डॉ. मीनल मोहगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्प समन्वयक डॉ. मानसी पाध्ये-गुर्जर आणि एसएमबीटी-एमएसएआयचे विद्यार्थी प्रतिनिधी जान्हवी साबू, जतीन कुकरेजा, जान्हवी पारकर, जान्हवी वलियपरमबिल आणि अथर्व देवकर यांनी परिश्रम घेतले.

20 दिवसांत मेडिकल कॉलेजमधील दैनंदिन कामकाज पहिले. दररोज मोठ्या रुग्णांवर होणारे उपचार तसेच शस्त्रक्रियांचा अनुभव घेता आला. विशेष म्हणजे, रुग्णांचे हॉस्पिटलसोबत असलेले नाते तसेच त्यांचा विश्वास हे किती महत्त्वाचे असते हे मी इथून घेऊन जाणार आहे.
– मार्ता पेरिज कॅब्रेरा, स्पेन

खरंच या ठिकाणी येऊन मी भारावले आहे. येथील फूड कल्चर, संस्कृती आणि येथील वातावरणातील शिक्षण यामुळे वेगळीच ऊर्जा मिळाली. या ठिकाणी घेतलेला प्रत्येक दिवसाचा अनुभव न विसरणारा असाच आहे. पुन्हा इथे येऊन शिक्षण घ्यायला आवडेल.
 – युरी सिल्वा, ब्राझील

The post नाशिक : परदेशी विद्यार्थ्यांना 'एसएमबीटी'त वैद्यकीय शिक्षणाचे धडे appeared first on पुढारी.