नाशिक : परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत सत्ताधारी श्री समर्थ  पॅनलची  कळवण मर्चंट को ऑप बँकेतील सत्ता अबाधित

दि कळवण मर्चंट को ऑप बँके www.pudhari.news
नाशिक (कळवण): पुढारी वृत्तसेवा
दि कळवण मर्चंट को ऑप बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी माजी चेअरमन गजानन सोनजे व माजी चेअरमन संजय मालपूरे विद्यमान चेअरमन नितीन वालखडे यांच्या श्री समर्थ पॅनलने 16 जागावर विजय मिळवित विरोधी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला. माजी चेअरमन मुरलीधर अमृतकार, ग्राहक संघाचे चेअरमन सुभाष शिरोडे, विद्यमान संचालक योगेश मालपूरे, प्रा. निंबा कोठावदे  यांच्या परिवर्तन पॅनलला  अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. निकाल घोषित होताच श्री समर्थ पॅनलच्या विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक कळवण शहरातून काढण्यात येऊन श्री विठ्ठल मंदीर परिसरात समारोप करण्यात आला.
दि कळवण मर्चंट को ऑप  बँकेच्या 17 जागांसाठी दि. 29 जानेवारीला  मतदान झाले. सोमवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता शेतकरी सहकारी संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात  मतमोजणीस प्रारंभ झाला. कळवण शहरातील 12 व अभोणा, नाशिक येथील मतदान केंद्रावर  क्रॉस वोटिंग झाल्यामुळे वेगवेगळ्या गटातील 1336 मतपत्रिका बाद झाल्यामुळे श्री समर्थ आणि परिवर्तन यांच्यात पहिल्या फेरीत काट्याची टक्कर झाली. दुसऱ्या फेरीत नाशिक शहरातील व अभोणा येथील मतदान केंद्रातील मतदारांनी श्री समर्थ पॅनलला तारल्यामुळे श्री समर्थ पॅनलने 16 जागावर विजय मिळविला. श्री समर्थच्या नितीन कोठावदे यांचा केवळ 140 मतांनी पराभव झाला परिवर्तन पॅनलचे सुभाष शिरोडे हे एकमेव विजयी झाले आहेत. माजी चेअरमन गजानन सोनजे व माजी चेअरमन संजय मालपूरे, विद्यमान चेअरमन नितीन वालखडे  यांच्या श्री समर्थ पॅनलने 16 जागावर विजय मिळवित विरोधी परिवर्तन  पॅनलचा धुव्वा उडवला. माजी चेअरमन मुरलीधर अमृतकार, ग्राहक संघाचे चेअरमन सुभाष शिरोडे, विद्यमान संचालक योगेश मालपूरे, प्रा निंबा कोठावदे  यांच्या परिवर्तन पॅनलला फक्त एक जागा मिळाली  आहे.
श्री समर्थ पॅनलच्या सर्वसाधारण 12 जागांमध्ये विजयी उमेदवार व मिळालेली मते….
गजानन सोनजे ( 3023  )योगेश महाजन ( 3216  ) नितीन वालखडे ( 2582  )सागर शिरोरे  ( 2995 ) सतीश कोठावदे ( 2385  ) लक्ष्मण खैरनार ( 2387 ) संजय मालपूरे ( 2834 ) प्रविण संचेती (  3089  ) दीपक वेढणे ( 2698  ) विनोद मालपूरे ( 2761 ) धनंजय अमृतकार (  2367 ) मते मिळवून विजयी झाले तर परिवर्तन पॅनलचे सुभाष शिरोडे यांनी (2638) मते मिळवून विजयश्री मिळविली. महिला राखीव गटाच्या दोन जागावर सौं शालिनी महाजन ( 2406  ) भारती कोठावदे (  2570  )मते मिळवून विजयी झाल्या.
अनुसूचित जाती-जमाती गटात एक जागेसाठी पोपटराव बहिरम ( 2658 ), इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक जागेसाठी रंगनाथ देवघरे ( 2854  ), भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गासाठी डॉ धर्मराज मुर्तडक ( 2469 ) मते मिळून विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभागाच्या यंत्रणेने नियोजनबद्ध कामकाज करीत मतमोजणी पार पडली. निवडणुकीचे निकाल हाती येताच श्री समर्थ पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष केला. श्री समर्थचा विजय हीच स्व. सुनील महाजन, स्व. सुनील शिरोडे, स्व. किशोर वेढणे, स्व. राजेंद्र अमृतकार यांना श्रद्धांजली ठरली असून सत्ताधारी गटाचे नेते गजानन सोनजे व संजय मालपूरे यांच्या नेतृत्वाखालील श्री पॅनलने दणदणीत विजय मिळवित परिवर्तन पॅनलचे फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले. निवडणूक काळात झालेले आरोप प्रत्यारोप, पत्रकबाजी, आणि विक्रमी मतदानामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली त्यामुळे परिवर्तन होईल अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. बँकेचे सभासद मात्र श्री समर्थ पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे  श्री समर्थ पॅनलने या निवडणुकीत एकतर्फी विजय प्राप्त केला आहे. ही निवडणूक सात वर्षांनी झाल्यामुळे परिवर्तन पॅनेलने सत्तारूढ गटाला जोरदार आव्हान उभे केले  होते. क्रॉस वोटिंगमुळे अनेक मतपत्रिका अवैध ठरल्यामुळे श्री समर्थ पॅनलच्या एका उमेदवाराचा निसटता पराभव झाला.
विद्यमान संचालकांची पुन्हा वर्णी –
विद्यमान संचालक मंडळातील गजानन सोनजे,प्रवीण संचेती,नितीन वालखडे, सौ.भारती कोठावदे,सौ.शालिनी महाजन, डॉ.धर्मराज मुर्तडक,पोपट बहिरम या सात संचालकांना सभासदांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर विद्यमान संचालक मंडळातील योगेश मालपुरे आणि प्रा.निंबा कोठावदे या संचालकांनी विरोधात जाऊन पॅनलनिर्मिती करूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
स्व.सुनील महाजनांना श्रद्धांजली –
मागील निवडणुकीत समर्थ पॅनलचे नेतृत्व करणारे माजी चेअरमन स्वर्गीय सुनील महाजन यांच्या प्रेरणेतून यंदाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलची निर्मिती होत निवडणुकीला सामोरे गेलेल्या समर्थ पॅनल ला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत सतरा पैकी सोळा संचालक निवडून देत स्वर्गीय सुनील महाजन यांना श्रद्धांजली अर्पण केली.विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत स्वर्गीय सुनील महाजन,स्वर्गीय सुनील शिरोरे,स्वर्गीय किशोर वेढणे यांची प्रतिमा ठेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यंदाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलच्या सोळा उमेदवारांना सभासदांनी प्रचंड मतांनी निवडून देत आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवून बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू – गजानन सोनजे, नेते, समर्थ पॅनल.
कमको निवडणुकीत बँकेच्या सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे.परिवर्तन पॅनल ने सत्ताधारी पॅनल विरोधात कडवी लढत दिली.आमच्या अनेक उमेदवारांचा कमी मतांच्या फरकाने पराभव झाला.सभासद,बँकेच्या प्रगतीसाठी काम करू – सुभाष शिरोडे, नेते, परिवर्तन पॅनल.
सुनीलभाऊंच्या आठवणीत अश्रु तरळले –
समर्थ पॅनलचे दिवंगत नेते स्वर्गीय सुनील महाजन यांच्या आठवणीने समर्थ पॅनलचे नेते गजानन सोनजे,बंधू योगेश महाजन आणि इतर संचालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.हा विजय सुनील महाजन यांना अर्पण केल्याची भावना यावेळी नवनिर्वाचित संचालकांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

The post नाशिक : परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत सत्ताधारी श्री समर्थ  पॅनलची  कळवण मर्चंट को ऑप बँकेतील सत्ता अबाधित appeared first on पुढारी.