नाशिक : पाणीकपातीच्या संकटावर राज्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

पाणी प्रश्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशावर यंदा अल निनोचे संकट घोंगावत असल्याने त्याचा फटका मान्सूनला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. परिणामी प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व प्रांत व तहसीलदारांची बैठक घेत पाणीबचतीसाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

दर चार ते सहा वर्षांनी देशावर अल निनोचा प्रभाव जाणवतो. अल निनोमुळे काही काळासाठी समुद्रातील पाण्याच्या तापमानात वाढ होते. परिणामी हवामानात बदल होऊन दुष्काळी परिस्थिती उद्भवते. यापूर्वी 2008, 2014 तसेच 2018 ला देशावर अल निनोचा प्रभाव जाणवला होता. चालू वर्ष हे अल निनोचे असू शकते, असे भाकीत भारतासह जगभरातील हवामान संस्थांनी वर्तविले आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना पाणी वापरासंदर्भात काटकसरीचे निर्देश देताना संभाव्य दुष्काळाच्याही उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजनांसंदर्भात बैठक घेतली. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

राज्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन
अल निनोमुळे एकदा पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा तो येईपर्यंत महिनाभराचा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे संकट बघता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजनाची बैठक पार पडली. त्यामध्ये असलेले पाणी वाचवायचे आणि येणारे पाणी (पाऊस) वाहून जाऊ न देता ते थांबविण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. तसेच जलसंधारणातून पाणी जमा करून सिंचनाद्वारे हे पाणी पिकांना देता येऊ शकते.

हेही वाचा:

The post नाशिक : पाणीकपातीच्या संकटावर राज्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन appeared first on पुढारी.