नाशिक : पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता; आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

सुहास कांदे,www,pudhari,news

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शहराच्या पाणी प्रश्नांसंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या मार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळाली आहे. गिरणा धरण ते नांदगाव शहर पाणी पुरवठा योजनेमुळे शहरातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुढील वीस वर्षांपर्यंतची वाढती लोकसंख्या विचारात घेवून पाण्याचे आरक्षण करण्यात आलेले आहे. आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने शर्थीचे प्रयत्न केल्याने यामध्ये त्यांना यश मिळाले आहे. त्यातच आता नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर झाली असल्याने मतदारसंघातील प्रत्येक गावाचा पाणी प्रश्न भविष्यात सुटण्यास मदत होणार आहे.

असा असणार प्रकल्प आराखडा.
* हा प्रकल्प संपूर्णपणे सौरऊर्जेवरच असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे होणारा त्रास कमी होईल .

* गिरणा धरणाच्या उद्भव क्षेत्रात एक कोटी ४९ लाख रुपये खर्चाची २५ फूट व्यासाची जॅकलीन पाण्याचा उपसा करण्यासाठी दीड कोटी खर्चाच्या २२५ अश्व शक्तीचे विद्युत पंप.
* गिरणा धरणापासून ते नांदगांव ग्रामीण रुग्णालया मागील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एक फूट दोन इंच व्यासाची एकूण साडे २८ किलोमीटर लांबीची १९ कोटी ९७ लाख ६० हजार रुपये खर्चाची मुख्य जलवाहिनी.

* दररोज साठ लाख लिटर पाणी शुद्धीकरण करण्यासाठी ३ कोटी ७८ लाखांचे जलशुद्धीकरण केंद्र.

* शुद्धीकरण झालेले पाणी शहरात वितरणासाठी शहराअंतर्गत ३ किलोमीटर अंतराची जलवाहिनी.

* १ कोटी १५ लाख रुपये खर्चाचे लक्ष्मीनगर आणि ग्रुपकृपा नगर येथे प्रत्येकी चार लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता; आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश appeared first on पुढारी.