नाशिक : पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित

अर्धनग्न मोर्चा स्थगित,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

दत्तनगर चुंचाळे परिसरात गुन्हेगारी वाढल्याने अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती करावी या मागणीसाठी अंबड एक्स्लो पॉइन्ट येथून निघालेला अर्धनग्न मोर्चा गरवारे पॉइन्ट येथे पोलिसांनी अडविला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पोलिस ठाणे निर्मितीचा विषय मार्गी लावतो असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित केला आहे. परंतु पंधरा दिवसांत पोलिस ठाण्याची निर्मिती झाली नाही तर पुन्हा मुंबई येथे अंबडपासून पायी अर्धनग्न मोर्चा काढणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर राकेश दोंदें,  रामदास दातीर यांनी दिला आहे.

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती करावी या मागणीसाठी मंगळवारी सकाळी साहेबराव दातीर, राकेश दोंदें, रामदास दातीर सह ग्रामस्थ जमा झाले. या नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर अंबड एक्सलो पॉइन्ट येथून मुंबईकडे रवाना झाले. या नंतर पुढे महामार्गावर गरवारे पॉइन्ट येथे मोर्चेकरांची आ. सीमा हिरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी भेट घेतली व मोर्चेकरांना चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी मोर्चेकरी शिष्टमंडळाशी चर्चा केली. नवीन पोलिस ठाणे निर्मितीसाठी काही त्रुटी लागल्या होत्या. त्या त्रुटी पुर्ण करून पुन्हा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे तसेच बुधवारी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पोलिस ठाणे निर्मितीचा विषय मार्गी लावतो असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आ. सीमा हिरे, पोलिस आयुक्त, जयंत नाईकनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख, माजी सभागृह नेते दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

 

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित appeared first on पुढारी.