नाशिक-पुणे येथे नोकरीची संधी ; 284 पदांसाठी आजपासून मेळावा

job

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 284 पदांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी
(दि. 25) मेळाव्यास प्रारंभ होणार असून, गुरुवार (दि. 28)पर्यंत मेळावा सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत.

ऑनलाइन रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक व पुणे जिल्ह्यातील सात नामांकित आस्थापना सहभागी होणार आहेत. या मेळाव्यामध्ये आठवी पास, एसएससी-एचएससी, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, वायरमन, मॅकेनिक मोटर व्हेईकल, सीएनसी ऑपरेटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, बी.ई./बी.टेक, 12 व सहा महिने अनुभवासह डिप्लोमा इन इंडस्ट्रियल रिलेटेड, केमिस्ट्री, वेल्डर, गॅस वेल्डर, गॅस व इलेक्ट्रिक वेल्डर, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट आदी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या मेळाव्यात विविध आस्थापनांचे नियुक्त अधिकारी ऑनलाइन पद्धतीने पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात ऑनलाइन मुलाखती देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अ. ला. तडवी यांनी केले आहे.

तळेगावात कचरागाड्यांचे सातत्याने काम

अशी आहेत पदे
महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, नाशिक : अप्रेंटिसशिप आणि ईपीपी ट्रेनिशिप, एसएससी इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मॅकेनिक मोटर व्हेईकल (50), डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस, नाशिक : ऑपरेटर (100), मोंक ऑटोमेशन प्रा. लि. नाशिक : प्रोजेक्ट मॅनेजर (4), तिरुमला इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड एलाइड सर्व्हिसेस, पुणे : डिप्लोमा (50), स्लाइडवेल माइलर टेक्नॉलॉजी, पुणे : वेल्डर (20), तालेंसेतू सर्व्हिसेस, पुणे : असेंब्ली लाइन ऑपरेटर (20), मशीन ऑपरेटर (20), एसएमपी ऑटो टेक : ट्रेनी सीएनसी ऑपरेटर (20).

हेही वाचा :

The post नाशिक-पुणे येथे नोकरीची संधी ; 284 पदांसाठी आजपासून मेळावा appeared first on पुढारी.