नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला मिळणार गती

रेल्वे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी नाशिक तालूक्यातील चार गावांचे जमीनीचे दर येत्या आठवड्याभरात प्रशासनाकडून घोषित केले जाणार आहे. तसेच सिन्नर तालूक्यातील १६ गावांतील संयुक्त मोजणीचे काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामूळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर तीन महिन्यांपासून नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न काहीसा साईड ट्रॅक झाला होता. राजकीय साठेमारीत प्रकल्पाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हे ऊभे ठाकले होते. पण, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेताना केंद्राकडे रेल्वेमार्गाच्या मंजूरीसाठी विनंती करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामूळे प्रकल्पाच्या कामाला पुन्हा एकदा वेग आला. दरम्यान, महारेलकडून सिन्नर तालूक्यातील १६ गावांमध्ये प्रकल्पात काहीसा बदल सुचविला आहे. या बदलात काही ठिकाणी रेल्वेमार्गाचे क्षेत्र कमी तर काही गावात ते वाढीव होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदर १६ गावांमधील संयुक्त मोजणी नव्याने सुरू केली आहे. येत्या १५ तारखेपर्यंत ते पूर्ण करण्याची डेडलाईन ठेवली आहे.

नाशिक तालूक्यातील देवळाली, विहितगाव, बेलगव्हाण व संसारी या चार गावांमधील जमीन रेल्वेसाठी संपादित करायची आहे. मात्र, देवळालीवगळता उर्वरित तीन्ही गावांमध्ये शेतकरी विरूद्ध देवस्थान वाद असल्याने प्रशासनाने जमीनीचे दर घोषित करणे टाळले होते. सरकारने अखेर या प्रकरणी मध्यस्थी केल्यामुळे प्रकल्पाच्या मार्गाती विघ्न दुर झाले. त्यामुळे प्रशासनानेदेखील आता या चारही गावांचे दर जाहिर करण्याची तयारी केली आहे. पुढील आठवड्यात त्याबाबतची घोषणा केली जाणार असल्याने रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे.

नाशिक तालूक्यातील चारही गावांचे दर पुढील आठवड्यात जाहिर केले जाणार आहे. तर सिन्नरमधील १६ गावांमधील संयुक्त पुर्नमोजणीचे काम अंतिम टप्यात आहे. १५ ऑक्टाेबरपर्यंत ते पूर्ण होईल. -गंगाथरण डी., जिल्हाधिकारी, नाशिक.

सिन्नरला ३० हेक्टर अधिग्रहण : नाशिक-पुणे रेल्वेसाठी नाशिक व सिन्नर तालूक्यातील २८४ हेक्टर जमीन अधिग्रहीत करायची आहे. त्या पैकी ३० हेक्टर क्षेत्र अधिग्रहण पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपतथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिकच्या तुलनेत नगरमध्ये १५ व पुण्यात केवळ १० हेक्टर क्षेत्राची खरेदी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला मिळणार गती appeared first on पुढारी.