नाशिक : प्रकाशयोजनाकार विनोद राठोड चिरायू पुरस्काराने सन्मानित

चिरायु पुरस्कार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेलार मामा फाउंडेशन व प्लॅनेट मराठी प्रॉडक्शन हाउसच्या वतीने मुंबई येथे गुढीपाडवा नूतन वर्षानिमित्त आयोजित चिरायू पुरस्कार समारंभात नाशिकचे प्रकाशयोजनाकार विनोद राठोड यांना चिरायू 2023 पुरस्काराने गौरविण्यात आले.

नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञ कलावंतांना यंदाचे पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये प्रकाश योजनेत व नाट्यक्षेत्रात आत्तापर्यंत केलेल्या एकूण कामगिरीची दखल म्हणून विनोद राठोड यांना हा पुरस्कार प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे व अभिनेत्री धनश्री कडगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पटकविणारे नाशिकमधील ते पहिले रंगकर्मी ठरले आहेत. व्यासपीठावर शेलार मामा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते सुशांत शेलार, प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर उपस्थित होते. अंधेरी येथील हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेटमध्ये नाट्य-सिनेक्षेत्रातील दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत दिमाखात हा सोहळा पार पडला.

हेही वाचा:

The post नाशिक : प्रकाशयोजनाकार विनोद राठोड चिरायू पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.