नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ‘इतके’

कोरोना लस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारत देशाने 17 जुलैस दीड वर्षामध्ये कोरोना प्रतिबंधक लशींचे 200 कोटी डोस पूर्ण करून जगात नवे कीर्तिमान स्थापित केले आहे. याचवेळी नाशिक जिल्ह्यातही 98 लाख 39 हजार 499 डोस देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात 17 जुलैपासून सुरुवात झालेल्या लसीकरणानंतर आतापर्यंत पात्र लोकसंख्येच्या 89 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यात 17 जुलै 2021 रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास प्रारंभ झाला. सुरुवातीला लशींचा पुरेसा पुरवठा उपलब्ध न होणे व विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणार्‍या शंका यामुळे हे लसीकरण पूर्ण होण्यास किती काळ लागणार याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात असताना आरोग्य कर्मचार्‍यांच्या समर्पित भावनेमुळे गेल्या दीड वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लशींचे 98 लाख 39 हजार 499 डोस देण्यात आले आहेत. सुरुवातीला फ—ंटलाइन वर्कर, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, 45 ते 59 या गटातील नागरिक व सर्वांत शेवटी 18 वर्षावरील युवा यांना क्रमाक्रमाने लशींचे डोस देत आरोग्य विभागाने गेल्या दीड वर्षामध्ये अविश्रांतपणे मेहनत घेऊन लसीकरणाचा मोठा टप्पा गाठला आहे. मागील काही महिन्यांपासून 15 ते 15 व 12 ते 14 या वयोगटातील मुलांचेही लसीकरण केले जात आहे. केंद्र सरकारने नुकतेच 75 दिवस मोफत वर्धक लसीकरणाची घोषणा केली आहे. या लसीकरणालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दुसरा डोस घेणारे 79 टक्के
नाशिक जिल्ह्यात 12 वर्षावरील वयोगटातील एकूण लोकसंख्या 57 लाख 40 हजार 847 आहे. यापैकी 89 टक्के लोकसंख्येला म्हणजे 51 कोटी 35 लाख 967 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजे अद्यापही सहा लाख नागरिक लसीकरणापासून दूर राहिले आहेत. पहिला डोस घेतलेल्यांपैकी 4513657 म्हणजे 78.62 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे 'इतके' appeared first on पुढारी.