नाशिक : प्रतिबंधित मांगूर मासा विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा

मांगूर मासा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र शासनाने विदेशी प्रजातीचा मांगूर मासा विक्री करणाऱ्यावर प्रतिबंध घातला आहे. तरीदेखील घरात मांगूर माशाचे संवर्धन करीत २०० ते ३०० किलो वजनाचे मासे विक्रीसाठी एकाने बाळगले. त्यामुळे नाशिकरोड येथील मस्त्यव्यवसायाचे सहायक आयुक्तांनी उपनगर पोलिस ठाण्यात संशयित किशोर आडणे (रा. आगर टाकळी) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

विनोद अशोक लहार (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी संशयित किशोर आडणे याच्या घराची तपासणी केली. किशोर याने राहत्या घरात पाण्याच्या हौदात मांगूर माशांचे संवर्धन केल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात केंद्र शासन, राज्य मस्त्यव्यवसाय आयुक्त, नॅशनल ग्रीन ट्र्युबनल यांच्या आदेशानुसार विदेशी मांगुर माशांची विक्री, वाहतूक व संवर्धन करण्यास बंदी आहे. त्यामुळे या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी किशोर आडणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : प्रतिबंधित मांगूर मासा विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.