नाशिक : प्रती जेजुरी शिंदवडला यात्रेनिमित्ताने देव मिरवणूक उत्साहात

देव मिरवणुक www.pudhari.news

नाशिक (दिंडाेरी/ शिंदवड) :  पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिंदवड येथील रत्नगडच्या श्री खंडेरायाची यात्रा दि. ६ एप्रिल रोजी भरत आहे. शिंदवड ग्रामपंचायत व यात्रा कमिटी व रत्नगड विकास समितीकडून यात्रेनिमित्ताने रत्नगड परिसरात अनेक कामे पूर्ण करण्यास सुरुवात झाली आहे.

यात्रेसाठी ३ ते ४ लाख भाविक दिवसभरात श्री खंडेरायाचे दर्शन घेण्याचा अंदाज आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक महत्वपूर्ण उपाय योजना मार्गास आहेत. यात्रेपूर्वी नऊ दिवस वाघे घटी बसण्याची परंपरा आहे. त्यानुसार गुरुवार (दि.30) रात्री ७ च्या सुमारास देव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी यात्रा कमेटीकडून वणीचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे यांसह  चव्हाण, शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. मिरवणुकीला वाघे मंडळीनी देवकाठीची पूजा केल्यानंतर गुलाल भंडारा उधळत वाजतगाजत श्रीखंडेरायाचा जयघोष करत रत्नगडपर्यंत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. परिसरातील सर्व भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. तरुणांची मोठी उपस्थिती होती. यात्रा कमिटीचे अध्यक्ष रंजित बस्ते, उपाध्यक्ष संजय गाडे, संजय बस्ते, बबन गाडे, निवृत्ती गाडे, राजेंद्र मोरे, बाबुराव बस्ते, विलास बस्ते, सोपान बस्ते, पुंडलिक गाडे, सोमनाथ बस्ते, पुंडलिक पवार, अशोक बस्ते, भाऊसाहेब बरकले, सागर बस्ते, तुकाराम कडाळे, बापू आहेर, बापू बस्ते, मुकुंद गांगुर्डे, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र पवार आदी शिंदवड ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

देव मिरवणुक www.pudhari.news
शिंदवड : यात्रेतील विविध उपाययोजना संदर्भात चर्चाप्रसंगी पोलीसांचा सत्कार करताना यात्रा कमिटीचे पदाधिकारी सदस्य.  (सर्व छायाचित्रे: समाधान पाटील)

हेही वाचा:

The post नाशिक : प्रती जेजुरी शिंदवडला यात्रेनिमित्ताने देव मिरवणूक उत्साहात appeared first on पुढारी.