Site icon

नाशिक : प्राचार्य डॉ. संपतराव काळे सिनेट सदस्यपदी विजयी

नाशिक (देवळाली कॅम्प/नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सपंतराव सहादराव काळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बहूमताने विजयी झाले. या जागेसाठी रविवारी (दि. २७) मतदान झाले होते. तर मंगळवारी (दि.29) पुणे येथे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्हयातून खुल्या गटाच्या पाच जागेंसाठी झालेल्या निवडणुकीत आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडून आलेल्या पाच उमेदवारांमध्ये प्राचार्य डॉ. संपतराव काळे यांचा समावेश आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, नाशिक ग्रामीण संचालक रमेश पिंगळे, नाशिक शहर संचालक लक्ष्मण लांडगे यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालय विकास व शालेय व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांनी प्राचार्य डॉ. संपतराव काळे यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : प्राचार्य डॉ. संपतराव काळे सिनेट सदस्यपदी विजयी appeared first on पुढारी.

Exit mobile version