नाशिक : प्रीमियर लीगमुळे खेळाडूंना प्रोत्साहन

खेळाडू www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रीमियर लीगसारख्या स्पर्धा झाल्या पाहिजेत. अशा स्पर्धांमधून खेळाडू नाशिकचे नाव उज्ज्वल करतील, असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले.

कर्मयोगीनगरच्या चॅम्पियन्स कोर्ट बॉक्स क्रिकेट टॅर्फ, परमानंद अकॅडमी व लॉजिक इव्हेंटच्या वतीने आयोजित नवीन नाशिक प्रीमियर लीगच्या बक्षीस वितरणात आमदार हिरे बोलत होत्या. खेळाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख समाजामध्ये निर्माण करावी व सामाजिक-राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम आपल्या युवकांच्या माध्यमातून व्हावे. अशा स्पर्धांमधून जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळाला आहे. अशा दर्जेदार स्पर्धांमधून जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणारे खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी लॉजिक इव्हेंटचे अजिंक्य चुंबळे, अजय पाटील, परमानंद अकॅडमीच्या भक्ती कोठावळे, भाजप महिला मोर्चा सरचिटणीस रश्मी बेंडाळे, सिडको मंडल महिला मोर्चा अध्यक्ष रोहिणी जगडे आणि खेळाडू उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : प्रीमियर लीगमुळे खेळाडूंना प्रोत्साहन appeared first on पुढारी.