नाशिक : प्रोसिडिंगची पाने फाडली; कोकाटे समर्थक पाच संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हा www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणूक प्रक्रीयेत प्रोसिडिंगची पाने फाडून तसेच प्रोसेडिंग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आमदार कोकाटे समर्थक पाच संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या सहायक निबंधक अर्चना सौंदाणे यांनी फिर्याद दिली आहे.

संजय वामन खैरनार (रा. चास), शशिकांत गणपत गाडे (रा. मापारवाडी, सिन्नर), रवींद्र सूर्यभान शिंदे (रा. मुसळगाव), विनायक हौशीराम घुमरे (रा. सांगवी), अनिल दशरथ शेळके (रा. शिवडे) अशी पाच संचालकांची नावे आहेत. सभापती, उपसभापती निवडीच्या दरम्यान गुरुवारी (दि. 18) दुपारी 12.30 च्या सुमारास संबंधित संचालकांनी सही करण्यासाठी प्रोसिडिंग रजिस्टर घेऊन त्यातील प्रोसेडिंगची पाने फाडून नुकसान केले. तसेच प्रोसेडिंग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व सरकारी कामात अडथळा आणल्याची सौंदाणे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक रामदास धुमाळ पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : प्रोसिडिंगची पाने फाडली; कोकाटे समर्थक पाच संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.