नाशिक : फ्रेंच तरुणाचा सायकलवर भारत दाैरा

अलेक्झांडर कियियानोव्हा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अलेक्झांडर कियियानोव्हा हा ३४ वर्षीय फ्रेंच तरुण बुधवार (दि.१४) पासून सायकलवर भारत भ्रमणवर असून तीन महिन्यांत तो कन्याकुमारी येथे पोहोचणार आहे. मुंबई ते कन्याकुमारी अशा या सायकल भ्रमणाचा मार्ग मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, बंगळुरू त्यानंतर कन्याकुमारी असल्याची माहिती नाशिकच्या भारत -फ्रान्स सांस्कृितक मंडळ तसेच विश्व शैक्षणिक सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक प्रा. दीपक मगरे व महासचिव माधव गाडगीळ यांनी दिली.

अलेक्झांडर हा फ्रान्सच्या स्ट्रासबूर्ग शहराचा रहिवासी आहे. त्याने २०१६ साली फ्रान्स ते ग्रीस, २०१८ साली फ्रान्स ते स्वित्झर्लंड, २०२० साली उत्तर ते दक्षिण फ्रान्स आणि २०२२ फ्रान्स ते तुर्की अशी सायकल राइड केली आहे. ‘डिस्कव्हर इंडिया ऑन बायसिकल’ या उद्देशाने तो भारत भ्रमण करणार आहे. अलेक्झांडर हा भाषाशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारक असून, आंतरराष्ट्रीय संस्कृती, भाषा, साहित्य याचाही अभ्यासक आहे. विश्वशांती, आंतरराष्ट्रीय एकात्मता आणि मानवता टिकून राहण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : फ्रेंच तरुणाचा सायकलवर भारत दाैरा appeared first on पुढारी.